विराट कोहलीची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केलेली कामगिरी ही अतिशय वाखणण्याजोगी आहे. मात्र आयपीएलमध्ये विराटला आपला हा फॉर्म कायम राखता आला नाहीये. आयपीएलच्या बाराव्या हंगामात, बंगळुरुचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. या पराभवासह विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक पराभव पाहिलेला खेळाडू ठरला आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : रैनाला मागे टाकत कोहलीचा ‘विराट’ विक्रम

विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये 86 पराभव जमा झाले आहेत. या यादीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा रॉबिन उथप्पा 85 पराभवांसह दुसऱ्या तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 81 पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिक 79 पराभवांसह चौथ्या तर अमित मिश्रा आणि एबी डिव्हीलियर्स 75 पराभवांसह संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे.

घरच्या मैदानावर खेळत असताना, कोलकात्याने बंगळुरुवर 5 गडी राखून मात केली. अखेरच्या दोन षटकात आंद्रे रसेलने बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत सामना कोलकात्याच्या बाजूने फिरवला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. यानंतर बंगळुरुचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : विराट कोहलीला सूर गवसला, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान