29 November 2020

News Flash

IPL 2019 : विरूची ‘ड्रीम टीम’; धोनी, रोहित अन् विराटला डच्चू

या संघात एम. एस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालेले नाही.

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनं आयपीएल २०१९ ची आपली ‘ड्रीम टीम’ जाहीर केली आहे. सेहवागच्या या संघात एम. एस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. आज रविवारी मुंबई आणि चेन्नई संघामध्ये २०१२ च्या जेतेपदासाठी लढाई होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील आठ संघातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर सेहवागनं आपली ड्रीम टीम केली आहे. सेहवागनं संघाचा कर्णधार कोणालाही केलं नाही. मात्र, सेहवागनं धोनी ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पंतला संधी दिली आहे.

विरेंद्र सेहवागच्या ड्रीम टीममध्ये चार विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे सेहवागनं डेव्हिड वॉर्नला सलामीविर म्हणून पसंती न देता मध्यक्रमचा फलंदाज म्हणून निवडले आहे. विरेंद्र सेहवागने आपल्या ड्रीम टीमध्ये सलामीची जबाबदारी शिखर धवन आणि बेयरस्टोच्या खांद्यावर सोपवली आहे. तर मध्यक्रममध्ये लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर आणि पंत यांना निवडलं आहे. रसेल आणि पांड्याला अष्टपैलू म्हणून निवडलं आहे. फिरकी गोलंदाजात सेहवागनं श्रेयस गोपाल आणि राहुल चहरची निवड केली आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराहच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे.

सेहवागची ड्रीम टीम –

शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, केएल राहुल, डेव्हिड वार्नर, पंत, आंद्रे रसेल, हार्दिक पांड्या, रबाडा, राहुल चहर, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह आणि इमरान ताहिर(बारावा खेळाडू)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 1:40 pm

Web Title: ipl 2019 virender sehwag picks his favourite 11 of ipl 2019 virat kohli rohit sharma ms dhoni not included
टॅग IPL 2019
Next Stories
1 …तर हा संघ मारणार आयपीएल जेतेपदाचा चौकार
2 अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या म्हणतोय…
3 चेन्नई एक्स्प्रेस मुंबई रोखणार?
Just Now!
X