16 October 2019

News Flash

शिखरच्या पत्नीचा दिल्लीच्या संघासोबत भांगडा, हा व्हिडीओ एकदा पाहाच

दिल्लीची यंदाच्या हंगामात आश्वासक कामगिरी

आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली सुरुवात केली आहे. सध्या ५ विजयांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अकराव्या हंगामापर्यंत दिल्ली डेअरडेविल्स नावाने मैदानात उतरणारा दिल्लीचा संघ, बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स नावाने मैदानात उतरला. आयपीएल सामन्यांनंतर खेळाडूंसाठी संघमालक पार्टी आयोजित करत असतात. अशाच एका पार्टीमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनच्या बायकोने भांगड्यावर ठेका धरला.

शिखरची पत्नी आएशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत खुद्द शिखर, इशांत शर्मा हे खेळाडू आएशासोबत नाचताना दिसत आहेत.

दरम्यान, किमो पॉल आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेसनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादच्या संघाला करता आला नाही. या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर ३९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

First Published on April 18, 2019 3:52 pm

Web Title: ipl 2019 watch shikhar dhawan wife aaesha dance on bhangda song
टॅग IPL 2019