महेंद्रसिंग धोनी हा एक अत्यंत शांत आणि संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. सामना कितीही अटीतटीचा असो किंवा कितीही महत्वाची विकेट मिळालेली असो तो मैदानावर इतर खेळाडूंसारखा जल्लोष कधीही करताना दिसत नाही. पण IPL च्या एका सामन्यात मात्र धोनीचा अनावर झालेला राग पहिला मिळाला. IPL 2019 मध्ये राजस्थान विरुद्ध चेन्नईला ३ चेंडूत ८ धावा हव्या होत्या. सामना खूप चुरशीचा झाला होता. त्यावेळी बेन स्टोक्सने टाकलेला चेंडू मिचेल सॅन्टनरच्या कमरेजवळ आला त्यामुळे पंचांनी तो नो बॉल दर्शवला. पण थोड्याच वेळात लेग अंपायरशी सल्लामसलत करून पंचांनी तो चेंडू अचानक वैध ठरवला आणि नो बॉलचा निर्णय रद्द केला.

पाहा तो प्रसंग-

“फक्त पाच सामने खेळलेल्या क्रिकेटरला वर्ल्ड कपसाठी कसं काय निवडता?”

घडलेल्या प्रकारावरून डग आउटमध्ये बसलेला धोनी कधी नव्हे तो खूप जास्त संतापला. खेळाच्या नियमांचं भान विसरून धोनी थेट मैदानात घुसला आणि अंपायरशी तावातावाने वाद घालताना दिसला. धोनीच्या अशा वागण्यामुळे त्याला आदर्श मानणाऱ्या युवा खेळाडूंना त्याच्या या वर्तणुकीतून चुकीचा संदेश गेला. तसेच खेळाडू कितीही मोठा असला तरीही खेळापेक्षा मोठा नसतो अशा शब्दात त्या घटनेवरून धोनीवर टीका झाली.

“गांगुलीला उकसवणं अगदी सोपं”; माजी खेळाडूने सांगितली मैदानावरील भांडणाची आठवण

या घटनेबाबत त्यावेळी मैदानावर फलंदाजी करणाऱ्या मिचेल सॅन्टनरने CSK सोबत इन्स्टाग्राम लाईव्ह करताना पुढे काय झालं ते सांगितलं. तो म्हणाला, “धोनीचा रुद्रावतार पाहून मी पण इतरांसारखाच हबकलो. धोनी इतका शांत असतो. अचानक इतका कसा काय भडकला याचं मला पण आश्चर्य वाटलं. पण त्या वागण्यातून एक गोष्ट लक्षात आली की धोनी मनापासून संघाशी जोडला गेला आहे. पंचांच्या त्या कृतीमुळे थोडासा गोंधळ झाला हे नक्की.”

“विराट सर्वोत्तम; बाबर आझम आसपासही नाही”; पाकिस्तानी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

“सामन्यात एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे आम्ही तो सामना अखेर जिंकलो. कारण आम्ही जिंकलो नसतो तर प्रकरण लवकर शांत झालं नसतं. सामना संपल्यानंतर जेव्हा थोड्याशा गप्पागोष्टी झाल्यानंतर मी पाहिलं तर धोनी बाहेर होता. त्याला स्वतःला देखील माहिती होतं की त्याने जे केलं ते त्याची त्याला परवानगी नव्हती. त्यामुळे त्यानंतर तो अंपायर होते त्या ठिकाणी गेला आणि त्याने थेट त्यांची माफी मागितली”, असा किस्सा त्याने त्या प्रकाराबद्दल बोलताना सांगितला.