IPL २०१९ स्पर्धेला केवळ काजीच दिवस शिल्लक राहिले आहेत. २३ मार्चला या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सचा संघ हैदराबादच्या संघाशी भिडणार आहे. या स्पर्धेतील IPL २०१९ चा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून त्यातील मुंबईचे २ सामने घरच्या मैदानावर आणि २ सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर आहेत. या स्पर्धेत साऱ्यांचे लक्ष मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंग याच्या कामगिरीकडे असणार आहे. युवराजनेदेखील जोशाने मुंबईच्या संघात प्रवेश केला असून नेट्समध्ये कसून सराव केला आहे.

मुंबईने २०१८ मध्ये समाधानकारक कामगिरी केली. पण त्यांना प्ले ऑफ्समध्ये पोहोचता आले नव्हते. त्यामुळे २०१९ साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगा यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे, पण युवराज मात्र प्रथमच मुंबईकडून खेळणार आहे. त्यामुळे युवराजच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. युवराजनेही IPL च्या सराव सत्रात सहभाग घेत जोरदार फटकेबाजी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटर अकाऊंटवर युवराजने नेट्समध्ये खेळला पहिला चेंडूचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे युवराजने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला.

याशिवाय मुंबई इंडियन्सने तो मैदानात सराव सत्रासाठी येतानाचा एक व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. त्यात ”..और फिर आए युवराज सिंग… धागा खोल दिये,” असे कॅप्शन दिले आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे. जेव्हा युवी आणि धोनी यांची पहिली भेट होते आणि पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा युवराज धोनीच्या झारखंड संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतो, तेव्हा हा डायलॉय बोलला जातो. तोच डायलॉग येथे वापरण्यात आला आहे.