आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. त्याआधी प्लेअर ट्रान्स्फर विंडोमध्ये संघमालकांनी काही महत्वाच्या खेळाडूंची अदलाबदल केली. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने आपला महत्वाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे दिलं. लिलाव पार पडल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच याबद्दल भाष्य केलं आहे.

जाणून घ्या पार्श्वभूमी –

गेली काही वर्ष अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा हिस्सा होता. मात्र २०१८-१९ च्या हंगामात अखेरच्या सामन्यांमध्ये अजिंक्यची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथकडे राजस्थानचं नेतृत्व देण्यात आलं. काही सामन्यांनंतर स्मिथ ऑस्ट्रेलियात परतला आणि पुन्हा एकदा अजिंक्य राजस्थानचा कर्णधार बनला.

“मला थोडसं वाईट वाटलं, पण मी याचा फारसा विचार न करण्याचं ठरवलं. एक दिवस मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो, मात्र या विषयावर आमची कधीही चर्चा झाली नाही. मी माझी रणनिती पक्की ठरवून ठेवली होती”, अजिंक्य प्रसारमाध्यमांशी बोलत होता.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे म्हणतोय, मी प्रचंड आशावादी ! जाणून घ्या कारण…

‘दादा’ने विचारलं, दिल्लीकडून खेळशील का?

२०१९ विश्वचषकात मी साऊदम्पटनमध्ये भारताचा सामना पाहण्यासाठी आलो होतो. त्यावेळी सौरव गांगुली तिकडे आला आणि त्याने मला विचारलं, दिल्लीकडून आयपीएलमध्ये खेळशील का?? नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी नवीन शिकण्याची संधी मला मिळेलं असं मला वाटलं. वेगळ्या खेळपट्टीवर एक खेळाडू म्हणून मला सुधारणेला संधी मिळेल, असं वाटल्यामुळे मी सौरवने दिलेली ऑफर स्विकारली.

अजिंक्यच्या येण्यानंतर असा असेल दिल्लीचा संघ –

फलंदाज – श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जेसन रॉय (१ कोटी ५० लाख)

गोलंदाज – इशांत शर्मा, अमित मिश्रा, आवेश खान, संदीप लामिच्छाने, कगिसो रबाडा, किमो पॉल, मोहीत शर्मा (५० लाख), ललित यादव (२० लाख)

अष्टपैलू – अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन आश्विन, मार्कस स्टॉयनिस (४ कोटी ८० लाख), ख्रिस वोक्स (१ कोटी ५० लाख)

यष्टीरक्षक – ऋषभ पंत, अ‍ॅलेक्स केरी (२ कोटी ४० लाख), शेमरॉन हेटमायर ( ७ कोटी ७५ लाख)

अवश्य वाचा – IPL : चेन्नई सुपरकिंग्जच्या फिरकीपटूचा आयपीएलला रामराम