12 December 2019

News Flash

IPL 2020 : अखेरीस ठरलं! अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली

१९ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव

आयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणेने अखेरीस आपल्या संघाची साथ सोडली आहे. आगामी हंगामाकरता अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या महत्वाच्या बातमीची घोषणा केली आहे.

आयपीएलमध्ये अजिंक्यने आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय वन-डे आणि टी-२० संघात अजिंक्यला स्थान मिळत नसलं तरीही आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत असताना त्याने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये अजिंक्यच्या नावावर दोन शतकांचीही नोंद आहे.

First Published on November 14, 2019 5:14 pm

Web Title: ipl 2020 ajinkya rahane will play from delhi capitals from next season psd 91
टॅग Ipl
Just Now!
X