आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडूंचा यादरम्यान लिलाव करण्यात आला. ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या खेळाडूंचं या लिलावावर वर्चस्व पहायला मिळालं. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनीही या लिलावत चांगली रक्कम कमावली. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पॅट कमिन्सवर कोलकात्याने १५ कोटी ५० लाखांची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात कमिन्स सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊयात तेराव्या हंगामातले सर्वात ५ महागडे खेळाडू…

तेराव्या हंगामाच्या लिलावादरम्यान, दिल्ली, राजस्थान, पंजाब यासारख्या संघांचा प्रमुख खेळाडूंना संघात समाविष्ट करण्याकडे कल दिसला. तर राजस्थान रॉयल्सने तरुण खेळाडूंना अधिक संधी दिली. मात्र TOP 5 खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेलं नाही.

अवश्य वाचा – Video : आनंद पोटात माझ्या मावेना….कोट्यवधींची बोली लागलेल्या हेटमायरचा भन्नाट डान्स