07 July 2020

News Flash

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव

ESPNCricinfo चं वृत्त, यंदाच्या लिलावाच मान कोलकाता शहराला

२०२० सालात होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. १९ डिसेंबर रोजी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला जाणार आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. २०२१ साली सर्व संघमालकांच्या सहमतीने लिलाव नव्याने पार पडला जाणार असून यावेळी अनेक खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२० वर्षासाठी होणारा लिलाव हा छोटेखानी असेल असं कळतं आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल (Treading Window) करण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आगामी हंगामासाठी संघाची उभारणी आणि खेळाडूंच्या निवडीसाठी प्रत्येक संघमालकाला ८५ कोटींचा निधी देण्यात आला होता, त्यामध्ये गेल्यावर्षीच्या हंगामातून शिल्लक राहिलेल्या ३ कोटींच्या निधीची भर घालण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठीच्या लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघाकडे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2019 11:45 am

Web Title: ipl 2020 auction on december 19 in kolkata psd 91
Next Stories
1 भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतो संघात धोनीची जागा घेणं कठीणच !
2 जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिली महत्वाची बातमी….
3 अखेर बाबर आझमने करुन दाखवलं ! विराट कोहलीला दिला धोबीपछाड
Just Now!
X