IPL 2020 च्या हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात ९७१ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू असणार आहेत. IPL 2020 च्या लिलावासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया ३० नोव्हेंबरला संपली. आता सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्यासाठी ९ डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

एकूण सर्व संघांमधील ७३ जागांसाठी होणाऱ्या लिलावात २१५ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू, ७५४ नवोदित खेळाडू आणि दोन सहसदस्य राष्ट्रांतील खेळाडूंचा समावेश आहे.

‘या’ खेळाडूंनी केली नोंदणी

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू – १९
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेले भारतीय खेळाडू – ६३४
टीम इंडियाकडून न खेळलेले पण IPL चा किमान १ सामना खेळलेले भारतीय – ६०
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले परदेशी खेळाडू – १९६
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेले परदेशी खेळाडू – ६०
सहसदस्य राष्ट्रांतील खेळाडू – २

या लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्स पाहणार आहेत. या लिलावात प्रक्रियेत विविध परदेशी खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकूण ५५ खेळाडूंनी IPL 2020 साठी नोंदणी केली आहे.

IPL 2020 साठी नोंदणी केलेले परदेशी खेळाडू

ऑस्ट्रेलिया – ५५
दक्षिण आफ्रिका – ५४
श्रीलंका – ३९
वेस्ट इंडिज – ३४
न्यूझीलंड – २४
इंग्लंड – २२
अफगाणिस्तान – १९
बांगलादेश – ६
झिम्बाब्वे – ३
नेदरलँड्स – १
अमेरिका – १

दरम्यान, लिलाव प्रक्रियेचे काम ह्यू एडमीड्स यांच्याकडे असणार आहे. पहिल्या १० हंगामांसाठी रिचर्ड मेडली यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. पण IPL 2019 मध्ये हे काम  ह्यू एडमीड्स यांनी पाहिले होते.