News Flash

#CoronaVirus : IPL 2020 राहणार टीव्हीपुरतं मर्यादित?

IPL चे मुख्य प्रायोजकत्व विवो या चिनी कंपनीकडे

देशभरात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातदेखील विविध प्रदेशात कोरोनाची लागण झालेले रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तशातच IPL 2020 ही स्पर्धा केवळ टीव्हीवरील प्रेक्षकांपुरतीच मर्यादित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या भीतीने यंदाचा IPL चा हंगाम हा कदाचित केवळ टीव्हीवरील प्रेक्षकांपर्यंत मर्यादित राहू शकतो, अशी माहिती IPL अधिकाऱ्याने एएफपीला दिलेल्या माहितीत सांगितलं.

IPL 2020 : उच्च न्यायालयाचा BCCI ला दणका

IPL 2020 नियोजित वेळापत्रकानुसार खेळवायचे की त्यात काही बदल करायचे या मुद्द्यावर क्रिकेट मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक होणार आहे. IPL मधील ६० सामन्यांमध्ये मिळून सुमारे ११ बिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळणार आहे. IPL चे मुख्य प्रायोजकत्व विवो या चिनी कंपनीकडे असून त्यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी ३३० मिलियन डॉलर्स IPL ला दिलेले आहेत.

IND vs SA 1st ODI Live : …तरच होऊ शकतो सामना

“जरी सामना पाहायला प्रेक्षक आले नाहीत, तरीही आम्ही IPL नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यासाठी उत्सुक आहोत. वैद्यकीय आणीबाणीची वेळ आल्याने सध्या IPL केवळ टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांपुरतंच मर्यादित ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो. पण त्याला काही पर्याय नाही”, असे BCCI च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

“आमचे खेळाडू आणि चाहते दोघेही सुरक्षित राहावेत ही आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही IPL सुरळीतपणे पार पडावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणार आहोत”, असेही त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:17 pm

Web Title: ipl 2020 bcci senior official clarifies ipl could go tv only over coronavirus vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : उच्च न्यायालयाचा BCCI ला दणका
2 IND vs SA : पाऊस जिंकला, पहिला सामना रद्द
3 भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
Just Now!
X