06 March 2021

News Flash

IPL 2020 : चेन्नईच्या गोटात चिंतेचं वातावरण, संघ ५ खेळाडूंना करारमुक्त करणार

सोशल मीडियावर दिली माहिती

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल आता वाजलेलं असून, १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडला जाणार आहे. आगामी हंगामासाठी खेळाडूंनी Player Transfer Window अंतर्गत प्रमुख खेळाडूंची अदलाबदल केली आहे. याचसोबत काही संघमालक आपल्या संघातील खेळाडूंना करारमुक्तही करत आहेत. करारमुक्त झालेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं लागणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : सॅम बिलिंग्ज चेन्नई सुपरकिंग्जकडून करारमुक्त

चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आपल्या सोशल मीडियावर एक ट्विट करत, संघ उद्या ५ खेळाडूंना करारमुक्त करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे हे ५ नेमके कोणते खेळाडू असणार याबद्दल आता क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता लागली आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, चेन्नई सुपरकिंग्ज अंबाजी रायुडू, मुरली विजय, केदार जाधव, शार्दुल ठाकूर या खेळाडूंना करारमुक्त करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शुक्रवारी कोणते ५ खेळाडू चेन्नई सुपरकिंग्ज संघाची साथ सोडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : अखेरीस ठरलं! अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 6:15 pm

Web Title: ipl 2020 csk will release 5 players on friday psd 91
टॅग : Csk,Ipl
Next Stories
1 IPL 2020 : अखेरीस ठरलं! अजिंक्य रहाणे झाला दिल्लीकर, राजस्थानची साथ सोडली
2 Video : विराटचा सल्ला आणि शमीने उडवली बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण
3 Video : मनोज तिवारीने हवेतच पकडला भन्नाट झेल
Just Now!
X