चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एम.एस धोनी आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. शनिवारी मुंबई बरोबर सलामीचा सामना होणार आहे. आयपीएलपूर्वी धोनीच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. एम.एस. धोनीने चिनी मोबाइल कंपनी oppo शी करार केला आहे. oppo नं आपल्या सोशल मीडियावर नवी जाहिरात पोस्ट केली आहे. धोनीबरोबरचे व्हिडीओ oppo कंपनीनं आपल्या सोशल साइटवर अपलोड केले आहेत.

oppo च्या या जाहिरातीमुळे धोनी सध्या चांगलाच ट्रोल होत आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणानंतर धोनीने या कंपनीशी कसा काय करार करू शकतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. पण धोनीने मात्र याबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही.

oppo कंपनीने धोनीसोबतचे काही व्हिडीओ oppo india या ट्विटर खात्यावर पोस्ट केले आहेत. करार झाल्याशिवाय कोणताही क्रिकेटपटू कंपनीच्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे धोनी आणि या कंपनीचा करार झाला असेल. या कंपनीने आयपीएलचे औचित्य साधत धोनीचे काही व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.

oppo reno 4 pro हा स्मार्टफोन २४ सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. धोनीच्या एका जाहिरातीमधून ही माहिती समोर आली आहे. तयार राहा oppo reno 4 pro घेऊन येत आहोत. .. असं या जाहिरातीत oppo कंपनीनं म्हटलेय