12 December 2019

News Flash

IPL 2020 : रविचंद्रन आश्विन होणार दिल्लीवासी, लवकरच अधिकृत घोषणा

आश्विनचा पंजाबला रामराम

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विन आगामी हंगामात अखेरीस दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या देवाण-घेवाण करारावर अखेरीस अंतिम मोहर उमटली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल.

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक पदाची जबाबदारी स्विकारली होती. आश्विनला दिल्ली संघाकडे देण्यात कुंबळे तयार नसल्यामुळे हा करार काहीकाळ थांबवण्यात आला होता. पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनीही आश्विनला दिल्ली संघाकडे देण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हा करार आता झाल्यामुळे आगामी हंगामापासून पंजाबची कर्णधारपदाची सुत्र लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे.

First Published on November 6, 2019 11:06 am

Web Title: ipl 2020 delhi capitals complete ravichandran ashwin deal announcement soon psd 91
टॅग Ipl,Kxip
Just Now!
X