बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने केली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ आणि खेळाडू हळूहळू IPLसाठी तयारी करू लागले आहेत. भारतातील करोना व्हायरसची सर्व देशभर असलेली परिस्थिती पाहता ही स्पर्धा युएईमध्ये हलविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या खेळाडूंच्या करोना चाचण्या घेत आहे. करोना चाचणी निगेटिव्ह आली तरच खेळाडूंना युएईला जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

२० ऑगस्ट म्हणजेच आजपासून संघांना आपल्या खेळाडूंना घेऊन युएईला जाण्याची परवानगी IPL व्यवस्थापनाने दिली आहे. त्यानुसार सर्व संघ आपापल्या खेळाडूंची जमवाजमव करत आहेत. प्रिती झिंटाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि शिल्पा शेट्टीचा राजस्थान रॉयल्स संघ युएईसाठी रवाना होतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने युएई रेडी असे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात काही नवोदित खेळाडूंना टॅग करण्यात आले आहे, तर दुसरीकडे पंजाब संघाच्या फोटो अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी, संघाचे प्रशिक्षक आणि ‘रणजी’ किंग वासिम जाफर, मनदीप सिंग हे खेळाडू दिसत आहेत.

मोहम्मद शमी, वासिम जाफर, मनदीप सिंग रवाना-

राहुलने पोस्ट केला फोटो-

 

View this post on Instagram

 

Here we go @kxipofficial

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

नव्या दमाचा राजस्थानचा संघ युएईसाठी सज्ज

राजस्थान संघाचा एक सदस्य पॉझिटिव्ह

राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती १२ ऑगस्टला देण्यात आली होती. युएईच्या उड्डाणासाठी संघाच्या सदस्यांना आठवड्याभरात मुंबईत एकत्र येणे आवश्यक होते, हे लक्षात ठेवून ही चाचणी घेण्यात आली. बीसीसीआयने शिफारस केलेल्या दोन चाचण्यांव्यतिरिक्त सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि युएईला जाणाऱ्या संघ व्यवस्थापन सदस्यांची अतिरिक्त चाचणी घेण्यात आली होती. त्यात यागनिकचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. पण प्रशिक्षक यागनिक युएईला कधी रवाना होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.