X
X

IPL 2020 : कुलदीप यादवसाठी आगामी हंगाम महत्वाचा – संजय बांगर

...तर कुलदीपला संघाबाहेर ठेवणं कठीण

भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी, कुलदीप यादवसाठी आयपीएलचा आगामी हंगाम अतिशय महत्वाचा ठरणार आहे असं वक्तव्य केलं आहे. ते Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

“कुलदीप यादव माझा आवडता खेळाडू आहे. तो ज्या सामन्यात ५ बळी घेतो तिकडे प्रतिस्पर्धी संघ हरणार हे निश्चीत होतं. गेल्या हंगामात कुलदीप यादवसाठी काही सामने फारसे चांगले नव्हते. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा असेल, जर या वेळी त्याने चांगली कामगिरी केली तर त्याला संघाबाहेर ठेवणं खूप कठीण होईल.” बांगर यांनी आपली बाजू स्पष्ट केली.

नुकत्याच पार पडलेल्या विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कुलदीप यादवचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात कुलदीप पुनरागमन करत असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

23
  • Tags: kuldeep-yadav,
  • Just Now!
    X