आयपीएलच्या आगामी हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने लोकेश राहुलकडे संघाचं नेतृत्व देण्याचं ठरवलं आहे. पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडीया यांनी Sportsstar संकेतस्थळाशी बोलताना माहिती दिली. तेराव्या हंगामाच्या लिलावाआधी पंजाबने आपला कर्णधार रविचंद्रन आश्विनला दिल्लीच्या ताफ्यात दिलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत राहुल संघाचं नेतृत्व करेल अशी शक्यता वर्तवली जात होती, अखेरीस नेस वाडीया यांनी राहुलच्या नावाची घोषणा करुन शक्यतांवर शिक्कामोर्तब केलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांसाठी माजी मुंबईकर खेळाडू मैदानात

“आमच्याकडे कोणत्या खेळाडूंचा पर्याय शिल्लक आहे आणि त्यातून आम्हाला कोणाची निवड करता येईल हे पाहणं महत्वाचं होतं. लोकेश राहुल गेले काही हंगाम आमच्याकडून खेळतो आहे. तो सर्वोत्तम फलंदाज आहे याचसोबत तो संघाचं नेतृत्वही करु शकतो. याचसाठी राहुलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.” वाडीयांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – आयपीएल २०२० हंगामात होणार महत्वाचा बदल, मध्यावधीत होऊ शकते खेळाडूंची अदलाबदल

यासंदर्भात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी चर्चा झालेली असून त्यांनीही राहुलच्या नावाला हिरवा कंदील दर्शवला आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा असल्याचंही वाडीया यांनी स्पष्ट केलं. तेराव्या हंगामाच्या लिलावात पंजाबने ग्लेन मॅक्सवेलवर १० कोटी ७५ लाखांची बोली लावत संघात घेतलं. याचसोबत शेल्डन कॉट्रेलही ८ कोटी ५० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघात दाखल झाला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : कोलकात्याची कमान दिनेश कार्तिकच्याच हातात, प्रशिक्षकांनी केली घोषणा