05 March 2021

News Flash

IPLमध्येही ‘वर्क फ्रॉम होम’?

दक्षिण आफ्रिकेतील प्रयोग ठरला यशस्वी

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर साऱ्यांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. अजूनही बंदी पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. काही प्रमाणात अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना घराघरात रूजली आहे आणि सवयीचा भाग झाली आहे. पण एखाद्या क्रिकेट सामन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ असेल तर… यंदाच्या IPL स्पर्धेत असं केलं जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

यंदाच्या IPLमध्ये स्पर्धेचे ब्रॉडकास्टर असलेले स्टार स्पोर्ट्स हे समालोचकांना घरातून कॉमेंट्री करण्याचा पर्याय खुला करून देणार असल्याची चर्चा आहे. ‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’ म्हणजेच सामना एका ठिकाणी तर समालोचन विविध ठिकाणांहून अशी नवी कल्पना IPLसाठी राबवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतीच दक्षिण आफ्रिकेत टी३ सॉलिडारिटी कप स्पर्धा झाली. या स्पर्धेतील एकमेव सामन्यात तीन संघ एकमेकांविरूद्ध खेळले आणि त्यात एबी डीव्हिलियर्सचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे होते. त्यामुळे आफ्रिकेतील सेंच्युरियन पार्कवर सुरू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन चक्क भारतातील तीन समालोचकांनी केले.

इरफानने आफ्रिकेतील सामन्याबाबतचा फोटो केला होता ट्विट-

आफ्रिकेतील या सामन्यासाठी इरफान पठाणने बडोद्याच्या घरून, दीप दासगुप्ता याने कोलकाताच्या घरून आणि संजय मांजरेकर यांनी मुंबईच्या घरून एकत्र धावतं समालोचन केले. केवळ समालोचकच नव्हे, तर सर्व क्रु मेंबर्स (सहाय्यक कर्मचारी) यांनीही देशाच्या विविध भागातून लॉग इन करत काम केले. तर संपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे प्रमुख हे मैसून येथून वर्क फ्रॉम होम करत होते. ३६ षटकांच्या आफ्रिकेतील सामन्यासाठी जसं समालोचन करण्यात आलं तीच पद्धत यंदाच्या IPLसाठी वापरण्याचा विचार ब्रॉडकास्टर करत आहेत. सुरूवातीच्या काळात हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीसाठी जर असं शक्य झालं नाही, तर स्थानिक भाषांमध्ये करण्यात येणाऱ्या समालोचनासाठी ही संकल्पना राबवली जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 10:51 am

Web Title: ipl 2020 may experience virtual commentary as broadcasters propose work from home facility vjb 91
Next Stories
1 स्टोक्सबद्दलच्या ट्विटवरून युवी-इरफानमध्ये रंगला मजेशीर संवाद
2 धोनीच्या वाढदिवसाचा फोटो साक्षीने केला शेअर; पाहा कोण-कोण होतं पार्टीला हजर
3 भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का!
Just Now!
X