30 September 2020

News Flash

IPL 2020 : महेंद्रसिंह धोनी चेन्नईसाठी रवाना

CSK कँपमध्ये सहभागी होणार धोनी

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा अखेरीस बीसीसीआयने केली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. केंद्र सरकारने या स्पर्धेसाठी बीसीसीआयला मान्यता दिली असून…करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व संघांना कडक नियम आखून देण्यात आले आहेत. २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसाठी संघाने चेन्नईत एका छोटेखानी कँपचं आयोजन केलं आहे. या कँपसाठी संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी रांचीवरुन चेन्नईला रवाना झाला आहे.

सोशल मीडियावर धोनी आपल्या गाडीतून रांची विमानतळावर दाखल झाल्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे स्पर्धा स्थगित झाल्यामुळे त्याचं पुनरागमन लांबणीवर पडलं होतं. अखेरीस या स्पर्धेला मुहूर्त मिळाल्यामुळे आपल्या लाडक्या धोनीला मैदानात पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 4:35 pm

Web Title: ipl 2020 ms dhoni leaves for chennai psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 पाकविरुद्ध कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला इनहेलरची गरज का लागली?? जाणून घ्या…
2 बाबर आझमला आयपीएलमध्ये खेळण्याची गरज – नासिर हुसैन
3 भारतीय बॅडमिंटनपटूला करोनाची लागण, गोपीचंद अकादमीने सराव थांबवला
Just Now!
X