आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जने या सलामीच्या सामन्यासाठी तयारी सुरु केली आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही या हंगामासाठी जोमाने तयारी करतोय. गेले काही दिवस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. आगामी टी-२० विश्वचषकात धोनीला स्थान मिळवायचं असल्यास..त्याला आयपीएलमध्ये आपला खेळ दाखवावा लागणार आहे. एकीकडे धोनी निवृत्ती कधी घेणार ही चर्चा कायम सुरु असताना, धोनीने आपल्या नेहमीच्या शैलीत टीकाकारांना खास उत्तर दिलं आहे.

अवश्य वाचा – …तरच भारतीय संघात धोनीचा विचार होईल ! BCCI ची भूमिका कायम

तेराव्या हंगामाासाठी आयपीएलने खास जाहीरातींचा धडाका लावला आहे. सुरुवातीच्या जाहिरातींमध्ये धोनीसह सर्व कर्णधारांना ट्रोल करण्यात आलं. यानंतर नुकत्याच प्रसारित झालेल्या जाहीरातीत धोनी नेहमीप्रमाणे खेळ करु शकेल का?? या प्रश्नावर धोनीने…आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान, आगामी आयपीएल हंगामात धोनीने चांगली कामगिरी केली तरच त्याचा भारतीय संघात विचार केला जाईल असं बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थाला सांगितलं. सुनिल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने रविवारी अहमदाबादमध्ये आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली. मात्र या बैठकीत धोनीबद्दल चर्चाही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.