News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्स लावू शकतं विराटवर बोली

१९ डिसेंबरला पार पडणार लिलाव प्रक्रिया

IPL मधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यांनी IPL 2020 साठी काही जुने खेळाडू कायम (रिटेन्शन) राखले, तर काही नवीन खेळाडू अदलाबदल प्रक्रिया (ट्रान्स्फर विन्डो) करून घेण्यात आले. आता IPL 2020 साठी कोलकातामध्ये १९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. या साठी आठही संघ सध्या जय्यत तयारी करत आहेत. या लिलाव प्रक्रियेसाठी ९७१ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू असणार आहेत.

IPL 2020 : मुंबई इंडियन्सकडे आहेत ‘हे’ शिलेदार

मुंबईचा सध्या असलेला संघ खूपच समतोल आहे. तशातच मुंबईकडे केवळ १३.०५ कोटीची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकडून कमी base price असलेल्या युवा खेळाडूंवर जास्तीत जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. मुंबई संघाला ७ खेळाडूंची गरज आहे, ज्यात २ खेळाडू विदेशी असणे गरजेचे आहे, तर इतर खेळाडू भारतीय असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही नव्या दमाच्या खेळाडूंवर मुंबईकडून बोली लावली जाऊ शकते.

IPL 2020 Auction : जाणून घ्या ‘या’ प्रमुख खेळाडूंची base price

या खेळाडूंमध्ये सध्या विराटची जोरदार चर्चा आहे. विराट सिंग हा झारखंडचा एक प्रतिभावान फलंदाज आहे. विराट हा धोनीच्या झारखंडचा खेळाडू असल्यामुळे तो धोनीचा मोठा चाहता आहे. विराटने भारतासाठी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा खेळली आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतदेखील त्याने १० सामन्यात ५७.१७ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने ३ अर्धशतकेही लगावली. विजय हजारे स्पर्धेतही त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक आपली फलंदाजी दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर मुंबई इंडियन्सचा संघ बोली लावू शकतो अशी चर्चा आहे.

विराट सिंग

दरम्यान, मुंबईच्या संघात धवल कुलकर्णीची घरवापसी झाली आहे. राजस्थान संघातून ट्रेड करून धवल कुलकर्णीला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळाले आहे. मुंबईच्या संघाने आधी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला संघात घेतले होते. त्या पाठोपाठ त्यांनी मराठमोळ्या धवल कुलकर्णीलाही संघात घेत संघाचा वेगवान गोलंदाजीचा ताफा अजून तगडा केला. याशिवाय मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा हे दोन गोलंदाज आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 5:57 pm

Web Title: ipl 2020 mumbai indians may bid for virat in auction vjb 91
Next Stories
1 टीम इंडियात सर्वात वाईट डान्सर कोण? खेळाडू म्हणतात…
2 टी-२० विश्वचषकाला अद्याप अवकाश, विंडीजविरुद्ध मालिका विजय महत्वाचा !
3 VIDEO : टीम इंडियाची धमाल-मस्ती… कुलदीपने केली शमीची भन्नाट नक्कल
Just Now!
X