12 December 2019

News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्सकडून युवराज सिंहला बाहेरचा रस्ता

प्रमुख गोलंदाजांनाही मुंबईने दाखवला बाहेरचा रस्ता

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत मुंबईने ४ विजेतेपद पटकावली आहेत. २०१९ साली झालेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात केली होती. यानंतर आगामी हंगामासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईने गमावलं, कोलकात्याने कमावलं! मराठमोळ्या सिद्धेश लाडने मुंबईची साथ सोडली

मुंबईने आगामी हंगामासाठी १५ खेळाडूंना संघात कायम राखलं असून यात महत्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. तर ३ खेळाडूंची अदलाबदल केली असून १२ खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यात युवराज सिंह, अल्झारी जोसेफ आणि अन्य महत्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

१९ डिसेंबरला कोलकाता शहरात आगामी हंगामाचा लिलाव पार पडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ कोणत्या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on November 15, 2019 6:37 pm

Web Title: ipl 2020 mumbai indians released yuvraj singh and other important players watch video here psd 91
टॅग Ipl,Yuvraj Singh
Just Now!
X