01 October 2020

News Flash

IPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…

फिंचला बंगळुरू संघाने लिलावात ४.४० कोटींना केलं खरेदी

IPL 2020ची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या नियोजित क्रिकेट मालिकादेखील रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सर्व खेळाडू IPLमध्ये सहभागी होणार असल्याचं नक्की झालं. याचदरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने लिलावात खरेदी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज सलामीवीराने संघातील त्याच्या भूमिकेबाबत मत व्यक्त केलं.

IPL 2020 मधील खेळाडूंची संपूर्ण यादी, जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात…

बंगळुरू संघाकडे विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोन भरवशाचे खेळाडू आहेत. पण वरच्या फळीत तिसरा प्रतिभावान खेळाडू त्यांना सापडलेला नाही. पार्थिव पटेलने अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. पण त्याचा संघाला फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे यावर्षी अॅरोन फिंचकडून बंगळुरूच्या संघाला आणि चाहत्यांना अपेक्षा आहेत. त्यातच विराटसोबत मैदानावर एका संघात खेळण्याबाबत फिंचने मत व्यक्त केले आहे.

“विराटच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्याची माझी पहिलीच वेळ असणार आहे. पण मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. मी त्याच्याविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि IPLमध्ये अनेक वर्षे खेळलो आहे. त्यामुळे तो खेळाप्रति किती समर्पित आहे ते मला माहिती आहे. त्याचा मैदानातील आक्रमक वावर मला आता जवळून पाहायला मिळेल. माझ्या अनुभवाचा संघाला फायदा व्हावा हाच माझा प्रयत्न असेल. फलंदाजी करताना विराटवर दडपण येऊ नये म्हणून जे काही करता येईल ते मी करणार आहे. हीच माझी मैदानावरील भूमिका असेल”, असे फिंचने एएनआयशी बोलताना सांगितलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 4:01 pm

Web Title: ipl 2020 my role is to help take some pressure off virat kohli says rcb new cricketer aaron finch vjb 91
Next Stories
1 …म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट
2 IPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात
3 Video : भन्नाट! अब्बासने ‘असा’ उडवला स्टोक्सचा त्रिफळा
Just Now!
X