आयपीएलच्या आगामी हंगामाचं बिगूल आता वाजलं आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात हा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाआधी आयपीएलची ‘प्लेअर ट्रान्स्फर विंडो’ गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता बंद झाली. या प्रकियेदरम्यान अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघात गेले आहेत. रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे सारखे अनेक खेळाडूंचा संघ बदलला आहे, जाणून घ्या कोणता खेळाडू कोणत्या संघात गेला आहे या व्हिडीओच्या माध्यमातून….

अदलाबदल झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी – 

मुंबई इंडियन्स –
ट्रेंट बोल्ट दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मुंबई इंडियन्स संघाकडे (२.२ कोटी)
शेर्फन रुदरफोर्ड दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मुंबई इंडियन्सकडे (६.२ कोटी)
धवल कुलकर्णी राजस्थान रॉयल्स संघाकडून मुंबई इंडियन्स संघाकडे
—————————————————–
दिल्ली कॅपिटल्स –
रविचंद्रन आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब मधून दिल्ली कॅपिटल्स संघाकडे (७.१ कोटी)
अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाकडून दिल्ली कॅपिटल्स संघाकडे
मयांक मार्कंडे मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्स संघाकडे (१.४ कोटी)*
——————————————————
किंग्ज इलेव्हन पंजाब –

जगदीश सुचित दिल्ली कॅपिटल्स संघाकडून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे (२० लाख)
कृष्णप्पा गौथम पंजाब संघाकडे (६.२ कोटी)
——————————————————-
राजस्थान रॉयल्स –
एविन लुईस मुंबई इंडियन्स संघाकडून राजस्थान रॉयल्स संघाकडे
अंकित राजपूत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून राजस्थान रॉयल्स संघाकडे (३ कोटी)
अजिंक्य रहाणेच्या मोबदल्यात मयांक मार्कंडे आणि राहुल तेवतिया राजस्थान संघाकडे

याव्यतिरीक्त मुंबई इंडियन्सने आपल्या संघातील सिद्धेश लाडला कोलकाता नाईड रायडर्स संघाकडे सोपवलं आहे. बीसीसीआयच्या परवानगीने या दोन्ही संघांमध्ये करार झाला आहे.