News Flash

IPL 2020 : “आधी सामने जिंकायला शिका”; नेटिझन्सकडून RCB ट्रोल

बंगळुरूने केलेल्या ट्विटमुळे झाले ट्रोल

भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले. अमेरिकेच्या नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने पाठवलेल्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचे अवशेष शोधले.

नासाने याचे श्रेय चेन्नईचा इंजिनिअर शनमुगा सुब्रमण्यम याला दिले आहे. नासाच्या या शोध मोहिमेनंतर आता IPL मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ISRO ला एk विचित्र अशी विनंती केली होती. “आमच्या संघातील फलंदाजांकडून एक विनंती आहे. नासातील ज्या टीमने विक्रम लँडरचा शोध लावला, ते आमचे फलंदाज एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली यांनी मारलेले चेंडू शोधून देतील का? जर त्यांना हरवलेले चेंडू चंद्रावर सापडले तर कृपया त्यांनी ते चेंडू त्या दोघांनी परत करावेत, अशी विनंती RCB ने केली होती.

या ट्विटवरून RCB ला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

दरम्यान, RCB ने एक छोटासा व्हिडीओ पोस्ट करून तशी विनंती केली होती. त्यांचा या व्हिडीओची चांगलीच चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 4:44 pm

Web Title: ipl 2020 rcb royal challengers bangalore virat kohli abd trolled over congratulatory tweet to nasa for finding vikram lander debris vjb 91
Next Stories
1 जेस्सी गिलने मानले धोनीचे आभार, कारण…
2 ICC Test Ranking : विराट कोहलीचा स्मिथला झटका, क्रमवारीत रहाणेला फटका
3 World Cup 2019 च्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार