07 July 2020

News Flash

आयपीएलच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब, BCCI ने स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

BCCI वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

करोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. करोनामुळे सध्या देशभरातली परिस्थिती आणि वाढलेलं लॉकडाउन लक्षात घेता बीसीसीआयने तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता एप्रिल-मे महिन्याच्या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. ESPNCricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आयपीएलचे Chief Operating Officer हेमांग अमिन यांनी सर्व संघमालकांना यासंदर्भातली कल्पना दिलेली आहे. लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे आताच्या घडीला एप्रिल-मे महिन्यात आयपीएलचं आयोजन करणं शक्य नसल्याचं अमिन यांनी सर्व संघमालकांना कळवलं आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया चषक पुढे ढकलून त्या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात होती, मात्र पीसीबी अध्यक्ष एहसान मणी यांनीही आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करण्यास नकार दिला आहे. BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच कॉन्फरन्स कॉलवर एक बैठक पार पडली. ज्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खजिनदार अरुण धुमाळ हे उपस्थित होते. या बैठकीतच स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – आयपीएलसाठी आशिया चषक रद्द होणार नाही – PCB प्रमुखांनी सुनावलं

३ मे नंतर केंद्र सरकार लॉकाडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे पाहिल्यानंतर स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बीसीसीआय आपली अधिकृत बाजू मांडेल. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास पुढील वर्षात आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. २९ मार्च ते २४ मे या कालखंडात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2020 2:10 pm

Web Title: ipl 2020 reportedly suspended indefinitely after lockdown extension psd 91
टॅग Coronavirus,IPL 2020
Next Stories
1 आयपीएलसाठी आशिया चषक रद्द होणार नाही – PCB प्रमुखांनी सुनावलं
2 वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंना टॅग करून हरभजनचं सडेतोड मत
3 “किराणा मालाची दुकानं उघडा, पण क्रिकेट खेळू नका”
Just Now!
X