News Flash

IPL 2020 : मुंबईच्या ‘हिटमॅन’चा जोरदार सराव, पाहा VIDEO

१९ सप्टेंबरपासून होणार IPLला सुरूवात

IPL 2020ची अधिकृत घोषणा २ ऑगस्टला करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडू हळूहळू IPLसाठी तयारी करू लागले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार-फलंदाज रोहित शर्मादेखील IPLसाठी सज्ज होत आहे.

पार्थ पवार यांची धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्व भारतीय क्रिकेटपटूप्रमाणेच रोहितही त्याच्या घरी लॉकडाऊनमुळे कैद होता. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर तो नेट्समध्ये गोलंदाजांचा सामना करताना दिसला. करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे या वर्षी मार्चपासून सर्व क्रिकेट स्पर्धा सक्तीने स्थगित करण्यात आल्या होत्या. भारत-न्यूझीलंड यांच्यातील फेब्रुवारी महिन्याच्या टी-२० मालिकेत रोहितचा शेवटचा खेळताना दिसला होता. त्यानंतर १९५ दिवसांनी तो मैदानावर परतला. “१९५ दिवसानंतर अखेर हिटमॅनला खेळताना पाहायला मिळालं. त्याला खेळताना पाहण्याची प्रतिक्षा संपली”, अशा कॅप्शनसह रोहितने नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्वीट केला.

अनेक महिने न खेळल्यामुळे बहुतेक खेळाडूंसाठी IPL 2020 ही स्पर्धा आव्हानात्मक असणार आहे. IPL सामन्यांसाठी लागणारा फिटनेस कमावणं ही महत्त्वाची बाब आहे. तसेच बराच काळ क्रिकेटपासून सारेच लांब असल्याने खेळताना दुखापती टाळणे हे देखील एक महत्त्वाचे आव्हान असणार आहे. नव्या दमाच्या पंजाब संघाचे नेतृत्व लोकेश राहुल करणार असून तोदेखील तयारीला लागला आहे. संघाचा कर्णधार म्हणून तयारी करण्यासोबतच फलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी करण्याचेही आव्हान राहुलपुढे असणार आहे. त्यासाठी राहुलदेखील नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:04 pm

Web Title: ipl 2020 rohit sharma of mumbai indians hitting nets after long break of 195 days batting practice video goes viral vjb 91
Next Stories
1 प्रसारमाध्यमांधून होणाऱ्या टीकेमुळे धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतला असेल !
2 लॉकडाउन नंतर भारतात पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन, ISL च्या यजमानपदाचा मान गोव्याला
3 २०११ विश्वचषक विजयानंतरही धोनीच्या कर्णधारपदावर होतं गंडांतर, ‘या’ माणसाने केली थेट मध्यस्थी
Just Now!
X