03 June 2020

News Flash

IPL 2020 : Odd-Even च्या फॉर्म्युलावर रोहितने शोधलाय भन्नाट उपाय, तुम्हीच पाहा

यंदाच्या आयपीएलमध्येही मुंबईच बाजी मारणार??

आयपीएलचा तेरावा हंगाम आता जवळ येऊन ठेपलेला आहे. २९ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. दरम्यान या हंगामाच्या आधी आयपीएलने आपल्या जाहिरातींमधून कर्णधारांना मिष्कील पद्धतीने ट्रोल केलं आहे. यात रोहित शर्माला ट्रोल करताना, मुंबई इंडियन्स फक्त Odd-Even च्या फॉर्म्युल्यानूसार आयपीएल जिंकतं असं दाखवण्यात आलंय. आयपीएलच्या या भन्नाट जाहिरातीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला होता.

यानंतर आयपीएलने आणखी एक जाहीरात केली असून, यात रोहित शर्मा यंदाचं आयपीएलही आपणच जिंकणार…असा नकळत इशारा देताना दाखवला गेला आहे. पाहा ही भन्नाट जाहिरात…

‘बक-बक बकर’ या आपल्या पहिल्या जाहिरातीत आयपीएलने धोनी, रोहित, विराट अशा सर्वांना ट्रोल केलं होतं. त्यामुळे यंदाचं आयपीएल कोण जिंकत हे पाहणंही मजेशीर असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 11:51 am

Web Title: ipl 2020 rohit sharma on odd even formula new ipl ad psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 रविंद्र जाडेजाला रणजी अंतिम फेरीत खेळण्याची परवानगी नाही !
2 T20 World Cup : टीम इंडियाला फायनलसाठी सचिनच्या शुभेच्छा, म्हणाला…
3 “पंतला संघात घेण्याची बुद्धी कोणाला झाली होती?”
Just Now!
X