12 December 2019

News Flash

IPL 2020 : सनराईजर्स हैदराबादचाही ५ खेळाडूंना घरचा रस्ता

विल्यमसन-वॉर्नरसह प्रमुख खेळाडूंना संघात स्थान

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाने आगामी आयपीएल हंगामाची जोमाने तयारी सुरु केली आहे. १९ डिसेंबरला आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार आहे, यंदा कोलकाता शहराला हा मान मिळाला आहे. हैदराबाद संघाने आज संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात कर्णधार केन विल्यमसन यांच्यासह डेव्हिड वॉर्नर, राशिद खान यांच्यासह प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

यासोबत हैदराबादने आपल्या ५ खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. हैदराबादने युसूफ पठाण, शाकीब अल हलन, मार्टिन गप्टील, दीपक हुडा आणि रिकी भुई यांना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे आगामी हंगामाच्या लिलावात हैदराबाद कोणत्या खेळाडूला संघात स्थान देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on November 15, 2019 7:33 pm

Web Title: ipl 2020 srh release 5 players ahead of auction psd 91
टॅग Ipl,Srh
Just Now!
X