IPL 2020 स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. केवळ भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटरसिक IPL ची वाट पाहत आहेत. या स्पर्धेसाठी सारेच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. विविध संघांनी आपले प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि इतर व्यक्तिंची निवड केली आहे. काही संघ अजूनही काही निवडींबाबत साशंक आहेत. पण या दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद या संघाने आपल्या यंदाच्या हंगामासाठी कर्णधाराची घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी वॉर्नरचा एक खास संदेशही ट्विट केला आहे. “हैदराबाद संघाच्या सगळ्या चाहत्यांना माझा नमस्कार. माझी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. केन विल्यमसन आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाचे चांगले नेतृत्व केले. IPL जिंकण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू”, असा संदेश त्याने व्हिडीओद्वारे दिला.

पाहा IPL 2020 साठी हैदराबादचा संघ –

कर्णधार – डेव्हिड वॉर्नर

फलंदाज – केन विलियम्सन, मनीष पांडे, विराट सिंग (१.९० कोटी), प्रियम गर्ग (१.९० कोटी), अब्दुल समद (२० लाख)

गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, बसील थम्पी

अष्टपैलू – मिचेल मार्श (२ कोटी), फॅबीयन अ‍ॅलन (५० लाख), विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, संजय यादव (२० लाख), संदीप बवानका

यष्टिरक्षक – जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धीमान साहा