15 August 2020

News Flash

IPL 2020 : ऑरेंज आर्मीचा पहिला सामना मुंबईशी, पाहा हैदराबाद संघाचं वेळापत्रक

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाहते आयपीएलच्या या सत्राच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसले आहेत. ऑरेंज आर्मी अर्थात सनरायजर्स हैदराबाद संघाने आपलं वेळापत्रक जारी केलं आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर हैदराबाद संघाचे वेळापत्र प्रसारीत करण्यात आले आहे.

हैदराबाद संघाच्या १४ सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार एक एप्रिल रोजी हैदराबाद संघाचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स संघासोबत होणार आहे. घरच्या मैदानावर तेराव्या सत्राची सुरूवात हैदराबादचा संघ करणार आहे. तर साखळी स्पर्धेतील अखेरचा सामना १५ मे रोजी कोलकाता संघासोबत इडन गार्डनवर होणार आहे. यंदाच्या सत्राची सुरूवात २९ मार्च पासून सुरु होणार असून अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे.

मार्श, प्रियम गर्ग, विराट सिंग , फॅबियन अ‍ॅलन , संदीप बावानाका, अब्दुल समाद आणि संजय यादव या खेळाडूंना सनरायजर्स हैदराबाद संघाने यंदाच्या लिलाव प्रक्रियेत करारबद्ध केलं आहे.

सनराइजर्स हैदराबादचा संघ –
केन विल्यमसन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, फॅबियन एलन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भंवका संदीप, बासिल थंपी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 10:39 pm

Web Title: ipl 2020 sunrisers hyderabad full schedule fixtures timings venues nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 Ind vs NZ : …आणि चंद्रशेखरच्या ‘फिरकी’ने न्यूझीलंडचे खडूस पंच ‘क्लिन बोल्ड’
2 प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीवर बंदीची कारवाई
3 शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! नेटकऱ्यांनी दिला हा सल्ला..
Just Now!
X