News Flash

BCCI च्या अडचणी वाढल्या, IPL ची स्पॉन्सरशिप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय

BCCI ला शोधावा लागणार नवा स्पॉन्सर

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने तेराव्या हंगामाची घोषणा केली. भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णयही गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. परंतू गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे बीसीसीआयने चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा असा दबाव सोशल मीडियातून वाढत होता. यानंतर VIVO कंपनीने तेराव्या हंगामातून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे.

चिनी कंपनीसोबतचा करार न मोडल्यामुळे सोशल मीडियावर बीसीसीआयला टीकेची झोड सहन करावी लागत होती. गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. ज्यानंतर भारतात चिनी वस्तूंविरोधातलं वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही चिनी कंपनीची स्पॉन्सरशिप सोडावी यासाठी दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने VIVO सोबतचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे टाकत हा निर्णय घेतल्याचं कळतंय. कंपनीसोबत झालेला करार, ओनरशीप पॅटर्न यांचा अभ्यास करुन कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

VIVO आणि BCCI यांच्यात ५ वर्षांसाठी २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार VIVO या हंगामासाठी स्पॉन्सरशिप रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पुढील हंगामात VIVO कंपनी पुन्हा स्पॉन्सरशिप देणार असून २०२३ पर्यंत हा करार कायम राहणार आहे. प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४४० कोटींचा निधी मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:43 pm

Web Title: ipl 2020 to have new title sponsor as vivo pulls out of 13th edition psd 91
Next Stories
1 ENG vs PAK : पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
2 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ‘इतक्या’ वेळा होणार करोना टेस्ट
3 युजवेंद्र चहल म्हणतो, कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम माझ्याकडे आहे !
Just Now!
X