12 December 2019

News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला नवीन गोलंदाज

सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली घोषणा

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघात महत्वाच्या खेळाडूला दाखल करुन घेतलं आहे. न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा ट्रेंट बोल्ट आगामी हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. आयसीसीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम झालेली

आहे.

याव्यतिरीक्त किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अंकीत राजपूत पुढील हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. १४ तारखेपर्यंत सर्व संघमालकांना आपल्या संघातील खेळाडूंची अदलाबदल करण्याची मूभा देण्यात आलेली आहे. दरम्यान रविचंद्रन आश्विनपाठोपाठ पंजाबने आपल्या संघातून दुसऱ्या गोलंदाजाला करारमुक्त केलं आहे. १९ डिसेंबर रोजी आयपीएलच्या आगामी हंगामाचा कोलकाता शहरात लिलाव पार पडला जाणार आहे.

First Published on November 13, 2019 7:45 pm

Web Title: ipl 2020 trent boult moves to mumbai indians psd 91
टॅग Ipl
Just Now!
X