IPL 2020 चा हंगाम दुबईत रंगला होता. त्यानंतर आता IPL 2021चं आयोजन भारतात होणार असल्याची चिन्हं आहेत. या स्पर्धेसाठी फेब्रुवारी महिन्यात लिलाव रंगणार आहेत. IPLच्या लिलावाआधी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केली. यात काही संघांनी धक्कादायक निर्णय घेतले. राजस्थानच्या संघाने स्टीव्ह स्मिथला संघाबाहेर केले. मुंबईने नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिन्सन या दोघांना करारमुक्त केले. पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला. अशा परिस्थितीत भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरेल याची भविष्यवाणी केली आहे.

IPL 2021: “त्या’ खेळाडूला KKRने करारातून मुक्त करायला हवं होतं…”

आकाश चोप्रा याने ट्विट करून काही अंदाज व्यक्त केले. त्यात तो म्हणाला की पंजाबने करारमुक्त केलेला फिरकीपटू मुजीब उर रहमान ७ ते ८ कोटींना विकला जाईल. ग्रीनला ५ ते ६ कोटींची बोली लागेल. मिचेल स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरेल. IPL इतिहासातील सर्वोच्च बोली त्याच्यावर लागण्याची शक्यता आहे. नवोदित जेमीसन ५-७ कोटींची दमदार कमाई करू शकतो. जेसन रॉय ४ ते ६ कोटींना विकला जाईल. मॅक्सवेल आणि कुल्टर नाईल यांनादेखील चांगली रक्कम मिळेल. IPL काळात ते उपलब्ध आहेत का यावर सारं अवलंबून आहे, असं ट्विट त्याने केलं.

IPL 2021: स्टीव्ह स्मिथला विकत घेण्यासाठी ‘या’ तीन संघांमध्ये असेल चुरस

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामासाठी लिलाव ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्या लिलावाआधी अनेक संघ आपापपसांत काही खेळाडूंची देवाण-घेवाण करत आहेत. रॉबिन उथप्पाला चेन्नईच्या संघाने राजस्थानकडून ट्रेड केलं आहे. लिलावाआधी असे अनेक ट्रेड दिसण्याची शक्यता आहे.