News Flash

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

आयपीएल २०२१ : बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली

करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतरच लीग पुढे ढकलण्यात आली. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

हेही वाचा – कुस्तीपटू सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस हरिद्वारला रवाना

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे (सीपीएल २०२१) आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नाही. सीपीएल २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. या कारणास्तव, ही लीग ७ ते १० दिवस अगोदर आयोजित करण्यासाठी वेस्ट इंडीज बोर्डाशी चर्चा केली जात आहे, जेणेकरून त्या लीगमध्ये खेळणारे आयपीएलचते खेळाडू यूएईत पोहोचू शकतील.

बीसीसीआय पुढील १० दिवसांत घोषणा करण्याची शक्यता

एका वृत्तानुसार, बीसीसीआय येत्या १० दिवसात आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करेल. बीसीसीआय अजूनही इंग्लिश खेळाडूंशी त्यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याविषयी चर्चा करत आहे. मात्र, इंग्लंड बोर्डाने आधीच सांगितले आहे, की ते आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडणार नाही.

हेही वाचा – पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदला ‘विमानप्रवेश’ का नाकारला?

पॅट कमिन्स आयपीएलबाहेर

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे म्हटले आहे. सध्याच्या मोसमात कोलकाता संघाला चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. संघाने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 11:20 am

Web Title: ipl 2021 bcci planning to resume league in uae on september 17 adn 96
टॅग : Ipl,IPL 2021
Next Stories
1 इंग्लंडच्या माजी कर्णधाराला रोहितच्या नेतृत्वाखाली खेळायचंय IPL!
2 ठरलं तर! यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम
3 BCCIच्या बैठकीपूर्वी सौरव गांगुली का झाला भावूक?
Just Now!
X