आयपीएलवर करोनाचं सावट आणखी गडद होत चाललं आहे. सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बायो बबलमध्येही करोनानं शिरकाव केल्याचं दिसत आहे. कोलकात्याच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर कोलकाता बंगळुरू सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता चेन्नई आणि राजस्थान सामनाही करोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

‘बालाजीच्या संपर्कात सर्वच खेळाडू आले होते. त्यामुळे त्या सर्वांना आयसोलेट व्हावं लागणार आहे. त्यांची दर दिवशी चाचणी केली जाणार आहे’, असं बीसीसीआच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील हा ३२ वा सामना होता. मात्र आता हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

चेन्नईने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ५ सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थानचा संघ एकूण ७ सामने खेळला असून ३ सामन्यात विजय आणि ४ सामन्यात पराभूत झाला आहे. आयपीएल गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएलवर करोनाचं सावट आल्याने बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आयपीएल २०२१स्पर्धेत ३० वा सामना कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.

IPL 2021 :विजयी सातत्य राखण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक

दिल्लीत आज सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई आयपीएल गुणतालिकेत चौथा स्थावर आहे. तर हैदराबादचा संघ सर्वात शेवटच्या स्थानी आहे.