News Flash

IPL २०२१ : बालाजीसोबत बसल्यामुळे मायकेल हसीला करोनाची लागण?

चेन्नईत हसीवर उपचार सुरू

Chennai super kings batting coach mike hussey tests negative for covid-19
चेन्नई सुपर किंग्ज डगआऊट

चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. हसी सध्या चेन्नई येथे क्वारंटाइन असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी तो करोना पॉझिटिव्ह आला होता.

 

करोनाने बायो बबलला भेदल्यानंतर आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. चेन्नईच्या संघातही करोनाने प्रवेश घेतला होता. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनर हे करोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याआधी केकेआरचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांनाही करोनाची लागण झाली. या सर्व कारणांमुळे आयपीएल कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मायकेल हसीने आपल्या प्रकृतीविषयी दिली प्रतिक्रिया

हसी म्हणाला, ”भारतात काय चालले आहे याबद्दल मला जाणीव आहे. फ्रेंचायझीकडून माझी काळजी घेण्यात आली. मी आता आयसोलेशनमध्ये विश्रांती घेत आहे आणि आशा आहे, की आणखी एक चाचणी निगेटिव्ह येईल.” मायकेल हसीच्या म्हणण्यानुसार, तो गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीजवळ बसला होता आणि कदाचित त्यामुळेच त्यालाही करोनाचा संसर्ग झाला.

आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी ५ सामने जिंकले तर २ सामने गमावले होते. गुणतालिकेत सीएसकेची टीम दुसऱ्या क्रमांकावर होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:23 pm

Web Title: ipl 2021 chennai super kings batting coach mike hussey tests negative for covid 19 adn 96
Next Stories
1 KKRच्या यष्टीरक्षक-फलंदाजाला झाला करोना
2 “भारतात IPL भरवण्यात आम्ही कोणतीही चूक केलेली नाही”, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं टीकाकारांना उत्तर!
3 IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी
Just Now!
X