01 March 2021

News Flash

IPL 2021 : CSK ने रैनाला कायम ठेवलं, पण हरभजनला….

दोन वर्षाचा करार संपुष्टात आला आहे.

IPL च्या १४ व्या हंगामासाठी चेन्नई संघानं सुरेश रैनाला संघात कायम ठेवलं आहे. तर हरभजन सिंहला रिलीज करण्यात आलं आहे. दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये दोघांनीही माघार घेतली होती. सीएसकेच्या एका आधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिवाय हरभजन सिंहनं ट्विट करत सीएसकेसोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचं सांगितलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सीएसकेचा आधिकारी म्हणाला की, सुरैश रैनाला पुढील हंगमासाठी आम्ही संघात कायम ठेवत आहे. तसेच एम. एस. धोनी २०२१ च्या सत्रात सीएसके संघाचं नेतृत्व करणार आहे. हरभजनसह आणखी काही खेळाडूंना आम्ही रिलीज करु शकतो. आयपीएल २०२१ च्या सत्रासाठी कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी बुधवारी सायंकाळी आम्ही घोषीत करणार आहोत. आयपीएलचा रणसंग्राम मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होऊ शकते.

दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन यानं ट्विट करत चेन्नई संघासोबतचा करार संपल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला की, ‘‘सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!’’


मार्च २०१८ मध्ये हरभजन चेन्नईसोबत जोडला होता. त्यावेळी सीएसकेनं दोन कोटी रुपयामध्ये त्याला खरेदी केलं होतं. हरभजन सिंहने २०१९ मध्ये सीएसकेकडून खेळताना भज्जीनं ११ सामन्यात १६ बळी घेतले होते. २०२० मध्ये दुबईत होणाऱ्या आयपीएलमध्ये वयक्तिक कारणामुळे हरभजन सिंहनं माघार घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 3:25 pm

Web Title: ipl 2021 chennai super kings retain suresh raina harbhajan singh said my contract with csk is over ipl 2021 auction csk ms dhoni nck 90
टॅग : Ipl
Next Stories
1 IND vs AUS: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं BCCIला खुलं पत्र, वाचा नक्की काय आहे प्रकरण
2 एक नंबर ऋषभ! ICC क्रमवारीत पंतची फिनिक्स भरारी
3 ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित विक्रम मोडल्याने मायकल क्लार्क संतापला; म्हणाला…
Just Now!
X