आयपीएल 2021 सध्या अशा टप्प्यावर आहे, जिथे बहुतेक संघ आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्यात गुंतले आहेत. प्रत्येक संघाने जवळपास 2 सामने खेळले आहेत. आज चेन्नईत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएलचा नववा सामना खेळणार आहेत. मुंबईला दुसऱ्या, तर हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या मोसमातील दोन्ही सामने गमावले आहेत, तर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा मागील सामना जिंकून विजयाचे खाते उघडले आहे. या सामन्यातील विजयासोबत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला अनेक विक्रम खुणावत आहेत.

…तर होतील विक्रम

  • शेवटच्या सामन्यात वॉर्नरने चांगली खेळी केली होती, पण बाकीच्या फलंदाजांनी काही विशेष कामगिरी केली नाही. वॉर्नरने आणखी एक अर्धशतक ठोकले तर आयपीएलमध्ये 50 अर्धशतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरेल. दुसरा क्रमांक शिखर धवनचा असून त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 42 अर्धशतके झळकावली आहेत.
  • आयपीएलमध्ये वॉर्नरला 200 षटकार पूर्ण करण्यासाठी 5 षटकारांची आवश्यकता आहे.
  • मागील काही सामन्यांपासून मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या मनीष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास, 100 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी 2 षटकार ठोकण्याची गरज आहे.
  • मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डलाही वॉर्नरप्रमाणे या सामन्याद्वारे एक विक्रम खुणावतो आहेत. आयपीएलमध्ये पोलार्डलाही 200 षटकार पूर्ण करण्यासाठी 2 षटकारांची आवश्यकता आहे.
  • आयपीएलमधील 50 बळी पूर्ण करण्यासाठी क्रुणाल पंड्या आणि शाहबाज नदीम यांना 2 विकेटची आवश्यकता आहे. शाहबाज सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू आहे.