मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रविवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. करोनातून सावरलेला वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किए पुनरागमनासाठी सज्ज असल्याने सध्या कागदावर तरी पंजाबच्या तुलनेत दिल्लीचे पारडे जड वाटत आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

करनऐवजी नॉर्किएला संधी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वामध्ये अनुभवाचा अभाव दिसून आला. आवेश खानऐवजी अखेरच्या षटकासाठी टॉम करनला पसंती देण्याचा पंतचा निर्णय दिल्लीला महागात पडला. मात्र नॉर्किए आता परतल्याने करनला संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या आघाडीच्या फळीकडून दिल्लीला यावेळी चांगल्या सुरुवातीची आशा आहे.

फलंदाजीत सुधारणेची गरज

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आघाडीचे पाच फलंदाज २६ धावांतच माघारी परतल्यामुळे पंजाबच्या फलंदाजीतील त्रुटी स्पष्ट झाल्या. निकोलस पूरनच्या जागी अनुभवी डेव्हिड मलानला मधल्या फळीत संधी दिल्यास पंजाबची फलंदाजी अधिक सक्षम होईल. मात्र गेल्या दोन लढतींपासून वानखेडेची खेळपट्टी गोलंदाजांसाठीही तितकीच लाभदायक ठरत असल्याने झाय रिचर्डसन किंवा रायले मेरेडिथ यांच्यापैकी एकाला वगळून फिरकीपटू रवी बिश्नोईला खेळवता येऊ शकते.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी