News Flash

DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आज आपल्या प्रमुख गोलंदाजाला खेळवणार?

आज संध्याकाळी दिल्ली-पंजाब भिडणार

दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल 2021चा 11वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी रंगणार आहे. मागील दोन्ही सामन्यात दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.

दिल्लीला राजस्थानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तर चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा सहज पराभव केला. दोन्ही सामन्यात पंजाब किंग्जची गोलंदाजी खूपच खराब झाली होती. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुल दिल्लीविरूद्ध गोलंदाजी विभागात काही बदल करु शकतो. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रिले मेरीडिथला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनला आज संधी मिळू शकेल. त्याचबरोबर रवी बिश्नोईला लेगस्पिनर मुरुगन अश्विनच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकेल.

नॉर्किया खेळणार?

दुसरीकडे, दिल्लीच्या संघातही बदल होऊ शकतो. मागील हंगामातील वेगवान स्टार एन्रिक नॉर्किया तंदुरुस्त असून संघात सामील झाला आहे. नॉर्कियाला करोनाची लागण झाली होती, मात्र, तो आता या आजारातून सावरला आहे. त्यामुळे टॉम करनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो.

संभाव्य प्लेईंग XI

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, अमित मिश्रा, एन्रिक नॉर्किया आणि कगिसो रबाडा.

पंजाब किंग्ज – केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्ड्सन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 4:46 pm

Web Title: ipl 2021 delhi capitals vs punjab kings match preview adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 RCB vs KKR : राहुल त्रिपाठीने घेतला विराट कोहलीचा शानदार झेल…पाहा VIDEO
2 VIDEO : बेअरस्टोच्या षटकारामुळे मोडला हैदराबादचा फ्रिज!
3 IPL 2021: विराटसेनेचं कोलकात्यावर वर्चस्व; ३८ धावांनी केलं पराभूत
Just Now!
X