धावांसाठी झगडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सपुढे गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये तारांकित फलंदाजांचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल.

दोन्ही संघांचे स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने झाले असून, दिल्लीने चार सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचे पारडे जड  मानले जात आहे. पंजाब किंग्जविरुद्ध १२४ धावांचे तुटपुंजे आव्हान पेलताना कोलकाताची ३ बाद १७ अशी अवस्था झाली होती. परंतु कर्णधार ईऑन मॉर्गनने झुंजार खेळीसह संघाची चार पराभवांची मालिका खंडित केली. दिल्लीने सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत सुपरओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला.  कोलकाताचा सलामीवीर शुभमन गिलला सहा सामन्यांत फक्त ८९ धावा करता आल्या आहेत.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी