करोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. आयपीएलमध्ये खेळाडूही बायो बबलमध्ये खेळत आहेत. तरीही काही खेळाडुंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. करोनाच्या दूसऱ्या लाटेनं तर अक्षरश: कहर माजवला आहे. भारताला अंडर -१९ विश्वचषक जिंकून देण्याऱ्या गोलंदाजाच्या आईनं करोनामुळे जीव गमवला आहे. या बातमीनंतर क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

२०१२ सालच्या अंडर-१९ विश्वचषकात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या फिरकीपटू हरमीत सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमजीत कौर असं त्याच्या आईचं नाव असून त्या ५६ वर्षांच्या होत्या. रविवारी आईला इंजेक्शन हवं असल्याची एक पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर टाकली होती.

IPL 2021 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीच्या स्टार खेळाडूला करोनाची बाधा

हरमीत सिंह यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळला आहे. हरमीत सिंह आतापर्यंत ३१ फर्स्ट क्लास, १९ लिस्ट ए आणि ७ टी-२० सामने खेळला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ८७ गडी बाद केलेत. त्याने ११ एप्रिल २०१३ साली राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यावेळी त्याने पुणे वॉरियर्सच्या रॉस टेलरला फिरकीच्या जादूत गुंतवून तंबूत पाठवलं होतं.