22 January 2021

News Flash

पुढील हंगामासाठी पंजाबने ख्रिस गेलचा विचार करु नये, आकाश चोप्राचा सल्ला

तेराव्या हंगामात पंजाबची आश्वासक झुंज

आयपीएलच्या तेराव्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आश्वासक खेळी केली. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये लागोपाठ सामने गमावणारा पंजाबचा संघ दुसऱ्या टप्प्यात लागोपाठ सामने जिंकून प्ले-ऑफच्या शर्यतीत होता. ख्रिस गेलला संघात स्थान दिल्यानंतर पंजाबच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या मुंबई, दिल्ली, बंगळुरुलाही पराभवाचं पाणी पाजलं. प्ले-ऑफचं स्थान मिळवण्यात पंजाब अयशस्वी ठरला तरीही लोकेश राहुलच्या संघाने दाखवलेल्या झुंजार वृत्तीचं कौतुक करण्यात आलं.

बीसीसीआयने तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. आगामी हंगाम बीसीसीआय भारतात आयोजित करण्याची तयारी करत असून यासाठी मेगा ऑक्शन करण्याचाही बीसीसीआयचा विचार आहे. माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राच्या मते पंजाबने पुढील हंगामाचा विचार करता ख्रिस गेलला संघात स्थान देऊ नये.

पंजाबने गेलऐवजी पुरनला संघात स्थान द्यावं.

 

“पंजाबला ख्रिस गेलबद्दल निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या हंगामांचा विचार करायचा असेल तर पुढची ३ वर्ष तुमच्यासोबत राहणाऱ्या खेळाडूंचा तुम्हाला विचार करावा लागेल. पुढील वर्षात बीसीसीआय मेगा ऑक्शन करण्याची दाट शक्यता आहे. माझ्या मते पंजाबने ख्रिस गेल ऐवजी निकोलस पूरनला संघात जागा दिली पाहिजे.” आकाश चोप्रा आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:42 pm

Web Title: ipl 2021 kings xi punjab should not retain chris gayle if there is a mega auction says aakash chopra psd 91
Next Stories
1 IND vs AUS: “विराट कोहलीची टीम इंडियामधील अनुपस्थिती म्हणजे…”
2 IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का; वेगवान गोलंदाजाची माघार
3 अन् सूर्यकुमार यादवनं केली विराटची स्तुती
Just Now!
X