News Flash

शाहरुख खानने मागितली KKRच्या चाहत्यांची माफी, म्हणाला…

काय म्हणाला शाहरुख खान?

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि अभिनेता शाहरुख खान. (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सामना खेळवला गेला. या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर १० धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली, तर दुसरीकडे कोलकाताचा पराभव झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. या पराभवानंतर कोलकाताचा मालक असलेल्या शाहरुख खानने चाहत्यांची माफी मागितली.

मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला १५३ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली. मात्र मधली फळी ढेपाळल्याने मुंबईने १० धावांनी विजय मिळवला. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. या पराभवानंतर कोलकाता संघाचा मालक असलेल्या शाहरुख खानने ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली.

सामना संपल्यानंतर शाहरुख खानने ट्विट केलं आहे. ‘कमी शब्दात म्हणायचं तर निराशाजनक कामगिरी. कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची माफी,’ असं शाहरुख खानने म्हटलं आहे.

कोलकाताने मुंबई इंडियन्सला १५३ धावांवर सर्वबाद केलं. रसेलनं १८ व्या षटकात गोलंदाजीला येत २ षटकात १५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे कोलकाताने १० धावांनी सामना गमावला. मुंबईकडून राहुल चहरने ४ बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 9:17 am

Web Title: ipl 2021 kkr vs mi shah rukh khan apologises to fans of kkr bmh 90
टॅग : IPL 2021
Next Stories
1 एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल : एफसी गोव्याच्या पदार्पणाकडे लक्ष
2 IPL 2021 : राजस्थानला मोठा धक्का, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर!
3 वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा :  महाराष्ट्राची विजयी सलामी
Just Now!
X