आयपीएल स्पर्धेची रंगत चढू लागली आहे. गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी प्रत्येक संघ धडपड करताना दिसत आहे. त्यात करोना संकट असल्याने प्रत्येक खेळाडू बायो बबलमध्ये आहे. खेळाडुंना फिटनेसची चिंता सतवत असते. मागच्या पर्वात रोहित शर्माला दुखापतींनी ग्रासलं होतं. गेल्या आयपीएल पर्वात रोहित दुखापतीमुळे अनेक सामन्यांना मुकला होता. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या फिटनेससाठी खास रणनिती आखली आहे. मागचा अनुभव गाठिशी बांधत रोहित आता फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे.

‘गेल्या ३-४ महिन्यांपासून फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्या पर्वात मला दुखापत झाली होती. त्यासाठी हॅम्स्ट्रिंग आणि लोअर बॉडी व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.’, मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत त्याने ही माहिती दिली आहे.

IPL 2021 : राजस्थानला मोठा धक्का, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर!

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या आयपीएल पर्वात दुखापतीमुळे थेट प्लेऑफच्या सामन्यात खेळला होता. दिल्लीविरुद्धच्या अंतिम फेरीत त्याने सर्वाधिक ६८ धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी तो संघात असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आयपीएलमधील दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी२० सामन्यांना सुद्धा मुकला होता. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळला होता.

IPL 2021: सूर्यकुमार यादवचा उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित; पहा व्हिडीओ

यावर्षी भारतात टी २० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे रोहितच्या फिटनेसकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. रोहित मैदानात असला तरी सघाचं मनोबल वाढतं.