आयपीएलमध्ये एकामागोमाग एक करोनाची प्रकरणं समोर येत आहे. त्यामुळे आता आणखी एक सामना रद्द होत असल्याचं दिसत आहे. सोमवारी कोलकाता बंगळुरु सामना रद्द झाल्यानंतर बुधवारी चेन्नई आणि राजस्थान दरम्यान खेळला जाणारा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. आता आज होणाऱ्या सामन्यावरही करोनानं आपली पडछाया टाकली आहे. दिल्लीत आज सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापूर्वी हैदराबादचा वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा सामना देखील रद्द होण्याची शक्यता आहे.

मुंबई आयपीएल गुणतालिकेत चौथा स्थानावर आहे. तर हैदराबादचा संघ सर्वात शेवटच्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभूत झाली आहे. हैदराबादची या आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामिगिरी राहली आहे. हैदराबादने ६ सामन्यापैकी ६ सामने गमावले आहेत. तर एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

मोठी बातमी! करोनामुळे आयपीएल स्पर्धा रद्द

करोना काळात आयपीएलचं आयोजन केल्यामुळे अनेक स्तरातून टीकेची झोड उठत आहे. त्यात बायो बबलमध्ये खेळाडू सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता खेळाडू आणि मॅनेजमेंट स्टाफला करोना झाल्याची प्रकरणं समोर येत असल्याने बायो बबलचा फुगा फुटल्याचं चित्र आहे. त्यात काही परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर काही खेळाडूंच्या घरच्यांना करोनाची लागण झाल्याने त्यांनी स्पर्धा अर्धवट सोडून घरी गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण आयपीएल आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.