News Flash

MI vs CSK IPL 2021 Live Update : चित्तथरारक सामन्यात मुंबईची चेन्नईवर सरशी, पोलार्डची वादळी खेळी

मुंबईच्या २० षटकात ६ बाद २१९ धावा

मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या वादळापुढे चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीला २ चौकार आणि एक षटकार खेचत सामना आपल्या बाजूने फिरवला. चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, पोलार्डमुळे मुंबईने चेन्नईवर ४ गडी राखून विजय नोंदवला.

मुंबईचा डाव

क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने दमदार फलंदाजी केली. यात रोहित आणि क्विंटनने या ६ षटकात बिनबाद ५८ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर चेन्नईचा मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला झेलबाद करत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहितने ३५ धावा केल्या. रोहित-क्विंटनने पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी रचली. रोहितनंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला वैयक्तिक ३ धावांवर बाद केले. सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर धोनीने मोईन अलीच्या हाती चेंडू सोपवला. त्याने धोनीचा विश्वास सार्थ ठरवत चेन्नईला यश मिळवून दिले. अलीने स्थिरावलेल्या क्विंटन डी कॉकचा स्वत: च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. १० षटकात मुंबईने ३ बाद ८१ धावा फलकावर लावल्या.

त्यानंतर कायरन पोलार्ड मैदानात आला. त्याने कोणताही दबाव न घेता कृणाल पंड्यासोबत भागीदारी रचली. पोलार्डने १५व्या षटकात शार्दुल ठाकूरला चौकार ठोकत १७ चेंडूत अर्धशतक साकारले. यंदाच्या आयपीएलमधील हे वेगवान अर्धशतक ठरले. १५ षटकात मुंबईने ३ बाद १५३ धावा फलकावर लावल्या. १७व्या षटकात सॅम करनने कृणाल पंड्याला पायचित पकडत ही भागीदारी मोडली. कृणालने ३२ धावा केल्या. कृणाल बाद झाल्यानंतर हार्दिक मैदानात आला. २ षटकात मुंबईला विजयासाठी ३१ धावांची गरज असताना त्याने दोन षटकार ठोकले. पण, त्यानंतर तो बाद झाला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीवर हल्ला चढवत आव्हान पूर्ण केले. पोलार्डने आपल्या ८७ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

चेन्नईचा डाव

नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. फाफ डु प्लेसिस, मोईन अली आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद २१८ धावा फलकावर लावल्या. आयपीएलमध्ये चेन्नईच्या मुंबईसमोर या सर्वाधिक धावा ठरल्या. फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. मात्र, ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्याच षटकात ऋतुराज माघारी परतला. मागील काही सामन्यात ऋतुराजने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते. मात्र यावेळी त्याला फक्त ४ धावांचे योगदान देता आले. ऋतुराज स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने मोर्चा संभाळला. त्याने सलावीर फाफ डु प्लेसिससोबत भागीदारी रचली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईने १ बाद ४९ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात असलेल्या मोईन अलीने १०व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. ३३ चेंडूत मोईनने अर्धशतक साकारले. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ११व्या षटकात डु प्लेसिसने षटकार खेचत चेन्नईचे शतक फलकावर लावले. याच षटकात डु प्लेसिस आणि अलीने आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने मोईन अलीला माघारी धाडले. अलीने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. अली बाद झाल्यानंतर डु प्लेसिसने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर तो पोलार्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. डु प्लेसिसनंतर सुरेश रैनाही माघारी परतला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. पोलार्डने मुंबईसाठी टाकलेल्या १२व्या षटकात दोन बळी घेत चेन्नईला संकटात टाकले.

रायुडू आणि जडेजाची अभेद्य भागीदारी

त्यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचली. जडेजाने संयमी तर, रायुडूने आक्रमक पवित्रा धारण करत मुंबईच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. डावाच्या १७व्या षटकात रायुडू-जडेजा यांनी ३० चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १७ षटकात चेन्नईने ४ बाद १७४ धावा केल्या. बुमराहने टाकलेल्या या षटकात रायुडू-जडेजा यांनी २१ धावा वसूल केल्या. आक्रमक खेळणाऱ्या रायुडूने १८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या २० चेंडूत रायुडूने अर्धशतक साकारले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. धवल कुलकर्णीने टाकलेल्या शेवटच्या षटकात चेन्नईला १४ धावा घेता आल्या. २० षटकात चेन्नईने ४ बाद २१८ धावा केल्या. रायुडूने २७ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर, जडेजा २२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४९ चेंडूत १०२ धावांची भागीदारी रचली.

आकडेवारी

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ३० सामने खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्सने १८ तर सीएसकेने १२ सामने जिंकले आहेत.

प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जिमी नीशम, धवल कुलकर्णी, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी.

Live Blog
23:41 (IST)01 May 2021
चित्तथरारक सामन्यात मुंबईची चेन्नईवर सरशी

शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीला २ चौकार आणि एक षटकार खेचत सामना आपल्या बाजूने फिरवला.पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावल्या.

23:24 (IST)01 May 2021
हार्दिक पंड्या - जिमी नीशम माघारी

अवघ्या ७ चेंडूत १६ धावांची खेळी करून हार्दिक माघारी परतला. सॅम करनचा तो दुसरा बळी ठरला. शेवटच्या चेंडूवर करनने नीशमला झेलबाद केले. शेवटच्या षटकात मुंबईला १६ धावांची आवश्यकता आहे. 

23:18 (IST)01 May 2021
मुंबईला विजयासाठी ३१ धावांची गरज

शेवटच्या २ षटकात मुंबईला विजयासाठी ३१ धावांची गरज आहे. कायरन पोलार्ड ७० तर हार्दिक पंड्या २ धावांवर नाबाद आहेत.

23:09 (IST)01 May 2021
मुंबईला चौथा धक्का

१७व्या षटकात सॅम करनने कृणाल पंड्याला पायचित पकडत ही भागीदारी मोडली. कृणालने ३२ धावा केल्या.

22:58 (IST)01 May 2021
पोलार्डचे १७ चेंडूत अर्धशतक

पोलार्डने १५व्या षटकात शार्दुल ठाकूरला चौकार ठोकत १७ चेंडूत अर्धशतक साकारले. यंदाच्या आयपीएलमधील हे वेगवान अर्धशतक ठरले. १५ षटकात मुंबईने ३ बाद १५३ धावा फलकावर लावल्या.

22:55 (IST)01 May 2021
पोलार्ड-पंड्याची अर्धशतकी भागीदारी

अपेक्षित धावा आणि चेंडू यांचे अंतर वाढत असताना मुंबईकडून कायरन पोलार्डने ३००च्या स्ट्राईक रेटने  फलंदाजी केली. त्याने पंड्यासोबत  अर्धशतकी भागीदारी रचली. 

22:41 (IST)01 May 2021
मुंबईचे शतक पूर्ण

मुंबईने १३व्या षटकात शतकी टप्पा ओलांडला. जडेजाने टाकलेल्या या षटकात पोलार्डने ३ खणखणीत षटकार खेचत २० धावा वसूल केल्या.

22:29 (IST)01 May 2021
क्विंटन डी कॉकही बाद

सूर्यकुमार माघारी परतल्यानंतर धोनीने मोईन अलीच्या हाती चेंडू सोपवला. त्याने धोनीचा विश्वास सार्थ ठरवत चेन्नईला यश मिळवून दिले. अलीने स्थिरावलेल्या क्विंटन डी कॉकचा स्वत: च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. १० षटकात मुंबईने ३ बाद ८१ धावा फलकावर लावल्या.

22:24 (IST)01 May 2021
सूर्यकुमार स्वस्तात बाद

रोहितनंतर मैदानात आलेला सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला वैयक्तिक ३ धावांवर बाद केले.

22:18 (IST)01 May 2021
मुंबईला पहिला धक्का

पॉवरप्लेनंतर चेन्नईचा मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला झेलबाद करत मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहितने ३५ धावा केल्या. रोहित-क्विंटनने पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली.

22:07 (IST)01 May 2021
मुंबईची दणक्यात सुरुवात

पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने दमदार फलंदाजी केली. यात रोहित आणि क्विंटनने या ६ षटकात  बिनबाद ५८ धावा केल्या. 

21:40 (IST)01 May 2021
मुंबईच्या फलंदाजीला सुरुवात

क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात मुंबईने बिनबाद ८ धावा केल्या.

21:20 (IST)01 May 2021
चेन्नईचे मुंबईला २१९ धावांचे आव्हान

धवल कुलकर्णीने टाकलेल्या शेवटच्या षटकात चेन्नईला १४ धावा घेता आल्या. २० षटकात चेन्नईने ४ बाद २१८ धावा केल्या.  रायुडूने २७ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर, जडेजा २२ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी ४९ चेंडूत १०२ धावांची भागीदारी रचली.

21:15 (IST)01 May 2021
चेन्नई दोनशेपार

१९व्या षटकात चेन्नईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. 

21:10 (IST)01 May 2021
रायुडूचे २० चेंडूत अर्धशतक

आक्रमक खेळणाऱ्या रायुडूने १८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या २० चेंडूत रायुडूने अर्धशतक साकारले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. बोल्टच्या या षटकात मुंबईने २० धावा वसूल केल्या. 

21:04 (IST)01 May 2021
रायुडू-जडेजाची अर्धशतकी भागीदारी

डावाच्या १७व्या षटकात रायुडू-जडेजा यांनी ३० चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १७ षटकात चेन्नईने ४ बाद १७४ धावा केल्या. बुमराहने टाकलेल्या या षटकात रायुडू-जडेजा यांनी २१ धावा वसूल केल्या.

20:58 (IST)01 May 2021
चेन्नई दीडशे पार

रायुडूने १६व्या षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला षटकार खेचत चेन्नईला दीडशेपार पोहोचवले. १६ षटकात चेन्नईने ४ बाद १५३ धावा केल्या.

20:47 (IST)01 May 2021
अंबाती रायुडू-रवींद्र जडेजा मैदानात

चेन्नईचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर अंबाती रायुडू-रवींद्र जडेजा मैदानात आले. १४ षटकात चेन्नईने ४ बाद १२६ धावा फलकावर लावल्या.

20:37 (IST)01 May 2021
कायरन पोलार्डचा डबल धमाका

डु प्लेसिसनंतर सुरेश रैनाही माघारी परतला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. पोलार्डने मुंबईसाठी टाकलेल्या १२व्या षटकात दोन बळी घेत चेन्नईला संकटात टाकले.  

20:34 (IST)01 May 2021
डु प्लेसिस अर्धशतकानंतर बाद

मोईन बाद झाल्यानंतर फाफ डु प्लेसिसने २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर तो पोलार्डच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. 

20:28 (IST)01 May 2021
चेन्नईचे शतक पूर्ण

जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ११व्या षटकात फाफ डु प्लेसिसने षटकार खेचत चेन्नईचे शतक फलकावर लावले. याच षटकात डु प्लेसिस आणि अलीने आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने मोईन अलीला माघारी धाडले. अलीने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावा केल्या.

20:24 (IST)01 May 2021
मोईन अलीचे अर्धशतक

यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात असलेल्या  मोईन अलीने १०व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. ३३ चेंडूत मोईनने अर्धशतक साकारले. १० षटकात चेन्नईने १ बाद ९५ धावा केल्या.

20:03 (IST)01 May 2021
पहिल्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईच्या ४९ धावा

ऋतुराज स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने मोर्चा संभाळला. त्याने सलावीर फाफ डु प्लेसिससोबत भागीदारी रचली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईने १ बाद ४९ धावा फलकावर लावल्या.

19:35 (IST)01 May 2021
चेन्नईचा मराठमोळा फलंदाज माघारी

ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड माघारी परतला. मागील काही सामन्यात ऋतुराजने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते. मात्र यावेळी त्याला फक्त ४ धावांचे योगदान देता आले.  पहिल्या षटकात चेन्नईने १  बाद ४ धावा केल्या.

19:12 (IST)01 May 2021
मुंबईच्या संघात दोन बदल

चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने संघात दोन बदल केले आहेत. जेम्स नीशम मुंबईकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे, तर धवल कुलकर्णीला नॅथन कुल्टर नाइलबदली स्थान देण्यात आले आहे. 

19:10 (IST)01 May 2021
नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजुने

आजच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Next Stories
1 ‘‘तुम्ही दोघे Laysच्या पाकिटासारखे”, गेल-चहलच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
2 MI vs CSK : सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या सामन्यासाठी दिल्लीचे मैदान सज्ज!
3 IPL २०२१च्या मध्यातच सनरायझर्स हैदराबादने बदलला कर्णधार!
Just Now!
X