इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा आजपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. आज गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आयपीएल २०२१चा पूर्वार्ध भारतात झाला. पूर्वार्धात २९ सामने खेळले गेले. यूएई स्टेजमध्ये एकूण ३१ सामने खेळले जातील. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) यंदाच्या हंगामाची शानदार सुरुवात केली. चेन्नई संघ १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विजेतेपदाचा विक्रम केला. प्रत्येक हंगामाप्रमाणे आयपीएलच्या या पर्वातही मुंबईने संथ सुरुवात केली. मात्र यूएईतील मागील हंगामाचा कित्ता यंदाही गिरवण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे. चला जाणून घेऊया आजचा सामना कसा, कुठे आणि किती वाजता पाहता येईल.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटमध्ये अजून एक भूकंप; विराट कोहलीवर लागला ‘मोठा’ आरोप!

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा कधी आणि कुठे होणार?

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा आज १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे.

आयपीएल २०२१चा ३०वा सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल?

आयपीएलच्या १४व्या हंगामाचा ३०वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना कुठे होणार आहे?

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने असतील.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात नाणेफेक किती वाजता होईल?

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात नाणेफेक संध्याकाळी ७:०० वाजता होईल.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील यांच्यातील सामना किती वाजता खेळला जाईल?

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना संध्याकाळी ७:३० पासून खेळला जाईल.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहायचे?

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या अ‍ॅपवर पाहता येईल?

तुम्ही हॉटस्टारवर चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. सामन्याचे लाइव्ह अपडेट आणि इतर बातम्या तुम्ही www.loksatta.com वर वाचू शकता.