News Flash

DC vs MI : विजयाची हॅट्ट्रिक साधण्यास दोन्ही संघ उत्सुक

आज चेपॉक मैदानावर रंगणार सामना

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स

आयपीएल 2021मध्ये आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना खेळला जाणार आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत दिल्ली तिसर्‍या, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे चेपॉकवर आज विजयाची हॅट्ट्रिक कोण साधणार, हे पाहणे रंजक ठरेल.

मुंबई संघात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल असे खेळाडू आहेत, जे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सक्षम आहेत. मात्र, त्यांना अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट डेथ ओवरमध्ये मुंबईला विजय मिळवून देत आहेत. त्यांच्याखेरीज राहुल चहर फिरकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सर्वांच्या योगदानामुळे मुंबईने क्रमश: 150 आणि 152 धावांचा बचाव केला होता.

दुसरीकडे, दिल्लीसाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे शिखर धवनचा फॉर्म. तो आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा (186 धावा) फलंदाज आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने स्टीव्ह स्मिथला संधी दिली, पण चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेला पुन्हा संधी मिळू शकते. दिल्लीकडे मार्कस स्टॉइनिस आणि ललित यादव यांच्यासारखे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. हे खेळाडूही आपली भूमिका बजावण्यास उत्सुक असतील. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आणि ख्रिस वोक्स हे दिल्लीच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतील. नॉर्कियाही त्यांच्यासाठी अतिरिक्त पर्याय आहे.

आकडेवारी

आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये 28 सामने झाले असून त्यामध्ये मुंबईने 16, तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. गेल्या 5 सामन्यांत मुंबईने दिल्लीचा पराभव केला आहे.

संभाव्य प्लेईंग XI

दिल्लीची कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, अ‍ॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 4:34 pm

Web Title: ipl 2021 mumbai indians vs delhi capitals match preview adn 96
Next Stories
1 VIDEO : मास्टरमाईंड धोनीने दिला सल्ला, त्यानंतर जडेजाने फिरवला सामना!
2 ‘‘धोनीनंतर जडेजाकडे चेन्नईचे नेतृत्व सोपवावे’’
3 मुंबई-दिल्ली संघर्षात वरचढ कोण?
Just Now!
X